Testimonials | SimuSoft Technologies
OUR COMMUNITY, OUR INSPIRATION

Words that inspire
our next chapter.

Messages of encouragement.

Voices of appreciation

मनापासून, आमच्यासाठी
ENGLISH
Super proud of you always and you have created such an example for so many to follow.

Jayashree Patait

Zensar

Read full message
मराठी
आधुनिक तंत्रज्ञान आणि नवी पिढी यांची हातमिळवणी करण्यासाठी कटिबद्ध असलेला हा दोस्त!

Adv. Prartana Sadavarte

Samiti

Read full message
ENGLISH
I was very much impressed by the work you are doing for the Future of Maharashtra and Country.

Ravindra Namjoshi

Read full message
मराठी
एवढा मोठा उद्योजक असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत कुठेही मोठेपणाचा आव नाही, मी पणा नाही.

Alaknanda Tai Patil

Read full message
मराठी
समिती साठी तू आहेस आणि तुझ्या साठी आम्ही आहोत हा परस्पर विश्वास आहेच.

Supriya Tai Kelovakar

Read full message
मराठी
या हृदयाचे त्या हृदयी अशी आपुलकी निर्माण करणारे होते.

Anita Kahate

Samiti

Read full message
मराठी
तुझी प्रगती हा आम्हा सर्वांसाठीच एक अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे.

Pradip Mandke

Read full message
मराठी
सुनील दादा आपल्या सारखे विद्यार्थी म्हणजे समितीचे मानबिंदू आहेत.

Arunanat Atre

Samiti

Read full message
मराठी
त्याच्या भाषणात त्याचा खडतर प्रवास, चिकाटी आणि करायचं तर उत्तमच हे फार प्रेरणादायी वाटलं.

Unattributed message

Name not supplied

Read full message
मराठी
सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून वागण्याची त्याची पद्धत मानवता दर्शवते.

Unattributed message

Name not supplied

Read full message

Adv. Prartana Sadavarte

Samiti

श्री. सुनील चोरे यांस ...

आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेऊन आपल्या उद्देशांची आखणी करत आधुनिक तंत्रज्ञान आणि नवी पिढी यांची हातमिळवणी करण्यासाठी कटिबद्ध असलेला हा दोस्त!

तो बोलू लागतो तेंव्हा तो 'वक्ता' वाटतो ... तो एखादा विचार मांडतो तेंव्हा तो 'विचारवंत' वाटतो... तो समितीत भेटला की 'कार्यकर्ता' वाटतो... तो कार्यक्रमाचे निवेदन करतो तेव्हा तो 'निवेदक' वाटतो... आणि सहज गप्पा मारताना तो सच्चा 'दोस्त' वाटतो .... असा हा माणुसकी जपणारा, अविरत कार्यमग्न असलेला, उत्साहाचा झरा असलेला हसतमुख, सद्‌गुणी बहुरूपी मित्र म्हणजे अर्थात सुनील चोरे .

प्रसन्न, तडफदार, विचारी, प्रयत्नशील अशा या मित्राने काल एका नव्या पर्वास मा. पवार सरांच्या शुभहस्ते प्रारंभ केला. त्यासमयी त्या स्थळी उपस्थित राहण्याची इच्छा असूनही काही कामानिमित्ताने आणि प्रकृती बिघडल्याने जमले नाही याची रुखरुख आहेच पण या शुभसमयी सखी - मनिषा, अलकनंदा, सुनीता, अनिता यांची बहारदार उपस्थिती लाभली असल्याने मीही मनाने तिथे होतेच.

दोस्ता,
तुझे हार्दिक अभिनंदन!
तुझ्या पुढच्या आणखी दमदार, आणखी विशाल वाटलीस खूप शुभेच्छा

proud of you ...

Back to testimonials ↑

Unattributed message

सुनिल .. सिम्युसॉफ्ट चा सर्वेसर्वा !!

एक अजब रसायन .. याचं काम दरदिवशी वेगवेगळ्या वृत्तपत्रात येत असतेच .. आज इथे लॅब उद्या नागालँड .. परवा जालिंदर नगर .. नि अस चालूच ... आज मात्र उद्घाटन प्रसंगी प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला .

तो बोलतो छानच पण आज आपल्या गुरुंना सर्व समिती मान्यवरांना फार आदरपूर्वक सन्मानित करत स्वतःची उद्योजक होण्याची कहाणी सांगितली आपले आदरणीय अध्यक्ष पद्मश्री प्रतापराव पवार सरांच्या एका वाक्याने प्रभावित होऊन जो धाडसी निर्णय घेतला तो यशस्वी करूनच सरांना उद्घाटनासाठी आमंत्रित केल . त्याच्या भाषणात त्याचा खडतर प्रवास , चिकाटी आणि करायचं तर उत्तमच हे फार प्रेरणादायी वाटलं . नेहमी खेळकर स्वभावाचा पण कामात तितकाच कर्तव्यदक्ष .. आज विविध पैलू पाहावयास मिळाले .. पवार सरांनी दिलखुलास कौतुक .. समितीचे सर्व जेष्ठश्रेष्ठ कार्यकर्ते आशिर्वादासाठी उपस्थित .. फारच विहंगम सोहळा !! अशीच यशाची शिखरं पादाक्रांत करत राहा .. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा सुनिल 💐💐🎉🎉🌳

Back to testimonials ↑

Jayashree Patait

Zensar

Dear @Sunil! Heartiest congratulations and wishing you and your company great success ahead!! Super proud of you always and you have created such an example for so many to follow. I am super happy for you, wanted to make it but had been to native for my Aai’a bday 😊...

I am coming soon to your office and once again best wishes Sunil 💐💐..

Analytics and AIML is my topic of interest 😁

Back to testimonials ↑

Ravindra Namjoshi

Dear Sunil,This is just to say thanku for inviting me for such a great function.I was very much impressed by the work you are doing for the Future of Maharashtra and Country.Hearty Congratulations And All the Best Wishes for Future endeavours. I am sure with this base you will expand your activities in the field of Logistics for Storages for Farm produce.The subject you were persuing for Doctorate.With

Warm Regards Ravindra Namjoshi

Back to testimonials ↑

Unattributed message

सुनील चोरे
कंपनीचे नाव simusoft
नावातच सौम्यता आहे
प्रत्यक्षात ही तसेच आहे.

सुमित्रा सदनच्या सर्व जुन्या सुनील च्या ताई गाई आहेत.
सर्वांशी प्रेमाने मिळून मिसळून वागण्याची त्याची पद्धत मानवता दर्शवते. आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया पक्काच करून त्याने उपक्रमाला सिद्ध करून हे स्त्रीलिंग केलेलाच आहे. शिवाय निसर्ग संवर्धन आणि सामाजिक यांचं कुठलंही भान ही आहेच

अभिनंदन सुनील जी 👍🙏🌸🌸

Back to testimonials ↑

Anita Kahate

Samiti

सुनील,

तुम्ही प्रेमाने बोलावलंत यासाठी आभार. 🙏 कार्यक्रम उत्तम झाला. अतिशय शिस्तबद्ध नियोजन, उत्तम सूत्रसंचालन आणि सरांचे, तुमचे, तुषार सरांचे आणि तुमच्या मोठ्या भावाचे मनोगत वातावरण भावनिक करणारे होते. या हृदयाचे त्या हृदयी अशी आपुलकी निर्माण करणारे होते. जेवण चविष्ट. जिल्ह्यांवर सर्वांनीच यथेच्छ ताव मारला. तुमच्या भरभराटीसाठी खूप खूप शुभेच्छा! जितकी भरभराट तितकंच तुम्ही समितीसाठी जास्ती काम कराल याची खात्री आहे!

जे घेऊ शकले नाही त्यांच्यासाठी काही फोटो जोडत आहे.

Back to testimonials ↑

Anitatai Deshpande

सुनील चोरे
"सिम्युसॉफ्ट" चा व्यवस्थापकीय संचालक

तंत्रज्ञानातून शिक्षणाची नवी क्रांती घडवणारे नेतृत्व

कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान हे फक्त मोठ्या शहरांपुरते किंवा मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित न ठेवता, ते तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत, ग्रामीण भागातील शाळांपर्यंत पोहोचवण्याचे स्वप्न पाहणारा आणि ते प्रत्यक्षात उतरवणारा दूरदृष्टी असलेला उद्योजक म्हणजे आपला सुनील ....

SimuSoft - Simulating Success या नावातच त्याचा विचार दिसतो. शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी त्याने फुरसुंगी, पुणे येथे उभारलेले हे AI-HPC Lab, Robotics-Mechatronics Lab, Makers Lab आणि AI Teachers Training Center हे फक्त लॅब नाहीत, तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांसाठी भविष्याची प्रयोगशाळा आहे.

वैशिष्ट्य म्हणजे -
व्यवस्थापकीय संचालक म्हणून मोठ्या पदावर असूनही त्याच्यातील शिक्षक आणि मार्गदर्शक कायम जागा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याशी, प्रत्येक शिक्षकाशी आपुलकीने बोलणे, त्याला समजून घेणे आणि तंत्रज्ञानाची भीती न घालवता गोडी लावणे, ही त्याची हातोटी आहे.

पद्मश्री प्रतापराव पवार साहेबांच्या शुभहस्ते होत असलेला हा उद्घाटन सोहळा हा केवळ एका कार्यालयाचा शुभारंभ नाही, तर सुनीलने गेली अनेक वर्ष पाहिलेल्या एका मोठ्या स्वप्नाचा शुभारंभ आहे हे नक्की...स्वप्न जरी त्याने पाहिले आणि साकारले तरी सर्वांसोबत ते भविष्यात आकार घेणार आहे...

अशा या कल्पक, मेहनती आणि नम्र व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा!

आजचा उद्घाटन सोहळा म्हणजे तर खूप हृद्य झाला...ऐकताना डोळे पाण्याने आणि कौतुकाने भरून येत होते...

आपल्या प्रतापराव पवार सरांच्या भाषणातील मिळालेल्या एका वाक्याने प्रेरित होऊन आज खूप मोठी कंपनी स्थापन केली...
याचे साक्षीदार होता आले हे आमचे भाग्य....

समितीचे रत्नाकर मते सर, तुषार रंजनकर,सुप्रिया ताई केळवकर ,हरीश बुटले,गोगटे ताई, गणेश काळे या सर्वांना सुनील ने आदरयुक्त मंचावर बसवले...सर्वांचा यथोचित सत्कार केला...माननीय पवार सरांचे प्रेरणादायी भाषण फारच छान झाले, सुनीलच्या मोठ्या बंधूने देखील खड्या आवाजात समितीची आठवण सांगत अतिशय भावनिक शब्दात सर्वांचे आभार मानले...

चोरे कुटुंब म्हणजे एकीची ,भक्तीची शक्तीची ,आणि प्रेमाची मूठ तिथे आज दिसत होती...

सर्व भारावून गेलेल्या कार्यक्रमानंतर रुचकर भोजनाचा आनंद देखील घेतला.....

सुनील...!! खूप अभिमान वाटतो तुझा...!!
तुझ्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा...!!!

Back to testimonials ↑

Alaknanda Tai Patil

सिम्युसॉफ्ट चा व्यवस्थापकीय संचालक सुनील... खरंच मनापासून कौतुक. पद्मश्री प्रतापराव पवार साहेब यांच्या एका वाक्याने प्रेरित होऊन स्वतः ची कंपनी ची उभारणी करणं, फक्त आपलाच नाही तर मी ज्या गावातून आलोय त्या गावातील मुलांनी तंत्रज्ञानाची भिती न बाळगता सहजपणे शिकावं यासाठी सोप्या भाषेत पुस्तक लिहिणं. खेड्यातील लोकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स शब्दांची ओळखच नाही तर या तंत्रज्ञानाचा शेतीसाठी कसा उपयोग करता येईल हे पटवून देणारा सुनील आपल्या गावांसाठी खरा शिक्षक मार्गदर्शक ठरला.

शून्यातून विश्व निर्माण करतांना आईचा, अक्काचा आशिर्वाद, पत्नी चा मक्कम पाठिंबा हे सांगताना तो तर भावनिक झालाच, पण ऐकणाऱ्यांना ही भरून आले होते. सुनील ची कंपनी पाहात असतांना त्याच्या कल्पकतेची, मेहनतीची मी मनोमन प्रशंसा करत होते. एवढा मोठा उद्योजक असूनही त्याचे पाय जमिनीवर आहेत कुठेही मोठेपणाचा आव नाही, मी पणा नाही. सहजता, नम्रतेचा खळाळता झरा आहे तो. म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे. उत्तरोत्तर प्रगती साठी लाखभर शुभेच्छा सुनील 💐💗

Back to testimonials ↑

Supriya Tai Kelovakar

प्रिय श्री. सुनील आणि सौ. विद्या

अनेक शुभेच्छा आणि सप्रेम नमस्कार.

आजचा तुमच्या Innovation centre च्या उद्घाटनाचा कार्यक्रम सर्वार्थाने सुंदर आणि परिपूर्ण झाला. सुनील तुझ्या आयुष्याची कथा ऐकताना थक्क झाले. तुझं आई वरचं निरतीशय प्रेम, वडीलां बद्दलचा आदर, मोठ्या बहिणीची माया आणि भावांनी तुला दिलेला खंबीर पाठिंबा. सगळंच विलक्षण आहे.

आदरणीय पवार सर तर तुझे गुरु आहेत. त्यांच्या बद्दलचा आदरभाव तुझ्या प्रत्येक शब्दात आणि कृतीत दिसतो. खूप धन्यता वाटते.

अश्या एका छान विद्यार्थ्यांशी जोडले जाणे हे आमचे पण भाग्य आहे. विद्याची सर्वस्वाने असलेली साथ आणि पुढची पिढी चि.वरुण , हा किती सुंदर मेळ आहे! समिती साठी तू आहेस आणि तुझ्या साठी आम्ही आहोत हा परस्पर विश्वास आहेच.

तुम्हाला तिघांनाही खूप शुभेच्छा! तुमचे मनापासून अभिनंदन आणि अनेक आशिर्वाद..नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आता तुला सीमेन पलिकडचे आकाश खुणावते आहे. 'Fly beyobd the Sky'

Back to testimonials ↑

Pradip Mandke

सुनील ,काही घरगुती अडचणीमुळे कालच्या तुझ्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी हजर राहू शकलो नाही. कार्यक्रम अतिशय सुरेख झाला याचे रिपोर्ट्स पाहिले आणि खूपच छान वाटले तुझी प्रगती हा आम्हा सर्वांसाठीच एक अभिमानाचा आणि आनंदाचा विषय आहे .सौ विद्याची आणि सर्व कुटुंबाची तुला असणारी मोलाची साथ तुला अजून प्रगतीपथावर नेईल याविषयी खात्री आहे. तुला तुझ्या सर्व उपक्रमांसाठी खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐👍👍👍👍👍

Back to testimonials ↑

Arunanat Atre

Samiti

खरंच सुनील दादाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
👍👍

सुनील दादा आपल्या सारखे विद्यार्थी म्हणजे समितीचे मानबिंदू आहेत 👏👏👏

आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

Back to testimonials ↑
WORDS OF APPRECIATION